देशात काल 82 हजार रुग्ण कोरोना मुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कालही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या तिपटीपेक्षा जास्त आहे. देशात काल 82 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानं देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 17 लाख 60 हजार 458 झाली आहे. काल देशात सत्तावीस हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशात काल 347 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशात 4 लाख 23 हजार 127 रुग्ण उपचाराधीन आहेत.