संरक्षण क्षेत्रासीठीच्या एकूण निधी पैकी 70 टक्के निधी देशांतर्गत निर्मितीसाठी राखीव, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण क्षेत्रात देशांतर्गत संशोधनाला आणि निर्मितीला प्राधान्य देणारा या वर्षीचा अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर या विषयावर आयोजित वेबिनार मध्ये ते बोलत होते. संरक्षण क्षेत्रातल्या एकूण निधी पैकी 70 टक्के निधी देशांतर्गत निर्मितीसाठी राखीव ठेवला आहे, असंही ते म्हणाले. परदेशातून शस्त्रास्त्र आयात करण्याची प्रक्रिया फार क्लिश्ट आणि वेळकाढू आहे. ही शस्त्रास्त्र भारतात पोहचे पर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे आपल्या संरक्षण सज्जतेसाठी ती निरुपयोगी ठरतात. या समस्येवर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हा एकमेव उपाय आहे, असंही मोदी म्हणाले.संरक्षण क्षेत्रात केंद्र सरकारनं सुरु केलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांमध्ये या क्षेत्रातल्या कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, हा या वेबिनारचा उद्देश होता. संरक्षण मंत्रालयातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठीही यी वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

 

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image