वस्त्रोद्योगाच्या लाभांश योजनेला 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्रोद्योग उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना म्हणजेच पी एल आय अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत आता येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पीएलआय साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 31 जानेवारी नंतर 14 फेब्रुवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या योजनेसाठी पात्र अर्जदार केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज दाखल करू शकतात असं मंत्रालयानं सांगितलं आहे.