देशभरात आजपासून १५ ते १८ वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजपासून १५ ते १८ वयोगटातल्या मुलांचं लसीकरण सुरू झालं. Cowin.gov.in या वेबसाइटवर ही नोंदणी करुन लसीकरणासाठी वेळ निश्चित करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर थेट जाऊनही नोंदणी करुन लस घेता येईल. नोंदणी एक जानेवारीपासून सुरू झाली आहे.  सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जात आहे. २००४ यावर्षी  किंवा आधी जन्मलेली मुलं कोविशिल्डसह इतर लसींसाठी पात्र आहेत २००५ ते २००७ या कालावधीत जन्माला आलेल्या मुलांना फक्त कोवॅक्सिन ही लस घेता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रातही आज सर्वत्र १५ ते १८ वर्षे या वयोगटासाठीचं लसीकरण सुरु झालं. याविषयी राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी अधिक माहिती दिली. मुंबई महापालिकेच्या ९ लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वर्षे या वयोगटासाठीचं लसीकरण सुरु झालं. भायखळा, शीव, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल, गोरेगांव, मालाड, दहिसर, कांजूरमार्ग आणि मुलुंड इथल्या प्रत्येकी एक केंद्रांवर ही सोय उपलब्ध आहे. या प्रत्येक केंद्राची दरदिवशी ५०० ते हजाहून अधिक लाभार्थ्यांना लस देण्याची क्षमता आहे. लसीकरण अधिक सुरळीत आणि गतीनं व्हावं यासाठी बहुतांश लसीकरण केंद्र आणि शाळांनी परस्पर सहकार्य आणि समन्वयाचा करार केला आहे. दरम्यान राज्यातल्या इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज सर्व संबंधितांची तातडीची बैठक बोलावली आहे.

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image