दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं २८८ धावांचं आव्हान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत पार्ल इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी २८८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋषभ पंतनं ८५ धावांची तडाखेबंद खेळी केली.  के. एल राहुल नं ५५, तर शार्दुल ठाकूरनं नाबाद ४० धावा केल्या. त्या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी केली. रवीचंद्रन आश्विननंही नाबाद २५ धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला ५० षटकात ६ गडी गमावून २८७ धावांची मजल मारता आली.