आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सीरिजमधला पहिला सामना पार्ल इथं सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सीरिजमधला पहिला सामना आजपासून पार्ल इथं सुरु झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिला सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर जानेमन मलानला केवळ ६ धावांवर बाद केलं.कर्णधार म्हणून के. एल. राहुलचा हा पहिलाच एकदिवसीय सामना आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळं राहुलकडं संघांचं नेतृत्व आलं आहे. या सामन्यातून व्यंकटेश अय्यरनं आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे.  शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या १५ व्या षटकात १ बाद ५७ धावा झाल्या होत्या.

 

 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image