गोव्यात भाजपाकडून ३४ उमेदवारांची यादी जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात भाजपानं ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उर्वरित सहा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्या चार उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसने काल त्यांच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीत आघाडी झाली आहे. तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी संयुक्तपणे ही निवडणूक लढणार आहेत.