युवा शेतकरी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रशांत मेश्राम यांची निवड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपातळीवर दिल्या जाणाऱ्या युवा शेतकरी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या मारोडी इथले युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांची निवड झाली आहे. चंद्रपुरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी आज त्यांच्या शेतीची पाहणी केली. मेश्राम यांच्याकडे सहा एकर जमीन असून या  शेतात त्यांनी विविध पिकं घेतली आहेत. सेंद्रीय खतांचा वापर करून त्यांनी, वांगी मिरच्या,कारले,आदी पिकांबरोबर  दोन एकर जागेत खरबुजाची लागवड केली आहे. याशिवाय करडई,हरभरा,तूर,मका,धान सारखी नगदी पिकही ते घेत आहेत. शेतीस पूरक म्हणून त्यांनी शेळीपालन, मस्य पालन, कुकुटपालन, पशुपालन आदी व्यवसाय सूरू केले आहेत.