फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक कीर्तीचा भारतीय संघ तयार होईल- मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत, खारघर इथं फुटबॉल एक्सलन्स ऑफ सेंटर अर्थात, उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऐणि इतर मान्यवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तर नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग आणि सिडकोचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, हे प्रत्यक्ष उपस्थित होतेत. तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची  मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.