देशात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर असलेले निर्बंध फेब्रुवारीअखेरपर्यंत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर असलेले निर्बंध फेब्रुवारीअखेरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. मात्र हवाई वाहतूक संचालनालयानं मंजुरी दिलेली उड्डाणं आणि माल वाहतुकीच्या विमानांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गेल्यावर्षीपासून हे निर्बंध लादण्यात आले आहेत.