मुंबई कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई कोविड-१९ ची दैनंदिन रुग्णसंख्या काल ६ हजाराच्या खाली आली. तर, बरे झालेल्यांची संख्या जवळजवळ तिप्पट आहे. काल ५ हजार ९५६ नवे रुग्ण आढळले. १५ हजार ५५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, १२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल आढळलेल्या रुग्णांपैकी ४ हजार ९४४ म्हणजे ८३ टक्के रुग्णांमधे लक्षणं नाहीत, ४७९ रुग्णांनी रुग्णालयात दाखल करावं लागलं. सध्या मुंबईत ५० हजार ७५७ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ५५ दिवस आहे.