पुणे जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू कराण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

पुणे : पुणे जिल्ह्यात कोविड संसर्गाचं प्रमाण कमी झालं असल्यानं, कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू कराव्यात, आणि महानगरपालिका क्षेत्रातल्या शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत बोलत होते. इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करावेत, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत, असं त्यांनी सांगितलं.

पुढच्या आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, तसंच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा, त्याबाबत तूर्त सक्ती करू नये, असं ते म्हणाले. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग उद्यापासून सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी परवानगी दिली आहे. कोरोनाविषयक कृती  समितीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन बंधनकारक राहणार आहे.

अमरावतीत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण प्रमाणावर वाढत असल्यानं जिल्ह्यातल्या शाळा बंदच आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी होईपर्यंत शाळा सुरु होण्याची शक्यता नाही. कारण जिल्ह्यात दररोज अडीचशेच्या वर कोरोना रुग्ण वाढत आहेत, मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे सध्या जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट २५ टक्क्याच्या वर आहे, तो कमी झाल्यावरच शाळा सुरू होतील, अशी माहिती जिल्ह्याच्या  पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.


Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image