कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६० कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज १६० कोटी लस मात्रांचा टप्पा पार केला. आत्तापर्यंत देशभरात १६० कोटी ६ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६७ कोटी १८ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीच्या दोन्ही मात्रा, तर ६३ लाख ९२ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १७ या वयोगटात आत्तापर्यंत ३ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. आजच्या दिवशी सकाळपासून देशभरात ३९ लाखाहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. यात १५ ते १७ वयोगटातल्या ६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली, तर ४ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची वर्धक मात्रा मिळाली आहे.राज्यातही आजच्या दिवशी सकाळपासून २ लाख ८५ लाखाहून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आत्तापर्यंत राज्यात एकूण १४ कोटी ५० लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ५ कोटी ९१ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची दुसरी, ४ लाख ९५ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लसीची वर्धक, तर १५ ते १७ या वयोगटातल्या २८ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image