प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेतल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. सरन्यायाधीश एन. व्ही रमण, न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या पिठासमोर या प्रकरणी एका संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी हा निर्णय देण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये फिरोझपूर इथं झालेल्या निदर्शनामुळे त्यांचं पथक एका पुलावर अडकलं होतं. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image