मुंबई महापालिकेतल्या आश्रय योजनेतल्या घोटाळ्याच्या चौकशीचे राज्यपालांचे लोकायुक्तांना आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. भाजपा आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी हा आरोप केला आहे. भाजपाच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधली जाणार असून, यामध्ये सफाई कामगारांच्या ३९ वसाहतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत १ हजार ८४४ कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत.