राज्यात नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल कोविड १९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. राज्यात काल ४३ हजार ६९७ नवे रुग्ण आढळले, ४६ हजार ५९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या २ लाख ६४ हजार ७०८ एक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ४ दशांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ९३ शतांश टक्के आहे.राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले २१४ रुग्ण आढळले. त्यापैकी १५८ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात, पुणे ग्रामीण १०, मुंबई ३१, कल्याण-डोंबिवली आणि पिंपरी चिंचवड प्रत्येकी ४, परभणी २, तर नाशिक, वसई विरार, औरंगाबाद, जळगाव आणि इतर राज्यातला असे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत २ हजार ७४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १ हजार ९१ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.