देशातल्या १५ ते १८ वयोगटातल्या निम्म्याहून पात्र लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरण मोहिमेला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.  प्रत्येकानं लसीकरण करून घेणं आणि कोविड संबंधित नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे, असं सांगून  संपूर्ण देश एकत्रितपणे या संकटाचा सामना करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या वयोगटातल्या ५० टक्के मुलांचं लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच  लसीकरणाची गती कायम राखण्याचं आवाहन केलं आहे.