आज जागतिक हिंदी दिवस सर्वत्र साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक हिंदी दिवस साजरा होत आहे. हिंदी भाषेचा वापर परदेशात वाढावा या उद्देशानं दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा या उद्देशानं २००६ साली आजच्या दिवशी नागपूर इथं पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात होती. परराष्ट्र मंत्रालय आणि परदेशातल्या भारतीय मोहिमां-अंतर्गत दर वर्षी १० जानेवारी रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी देशातल्या जनतेला हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यामध्ये योगदान देणाऱ्यांचं काम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावर हिंदी मधून केलेल्या प्रभावी भाषणांमुळे हिंदी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा अभिमान उंचावल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.