सीबीआयकडून एका अधिकाऱ्यासह साथीदाराला लाच प्रकरणी अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅप सिक्युरिटीजच्या विक्री विभागातील एका अधिकाऱ्याला त्याच्या एका साथीदारासह लाच प्रकरणी सीबीआयनं अटक केली आहे. दुसऱ्या बँकेतून गृहकर्ज हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत वीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या अधिकार्यांवर आहे. याला त्याची मागणी करताना आणि दहा हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना सीबीआयने सापळा रचून या अधिकाऱ्याला अटक केली याप्रकरणी आरोपीच्या या निवासस्थानी देखील छापा टाकण्यात आला दोन्ही आरोपींना आज अमरावती इथं सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.