राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केलं आभिवादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊसाहेबांनी घालून दिलेला लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आधुनिक काळातही मार्गदर्शक असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभिवादन केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल होत आहे असं ते म्हणाले.