भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामना सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून जोहान्सबर्ग इथं सुरु झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं असून, त्याच्याऐवजी के.एल. राहुल याच्याकडे भारताच्या संघाचं नेतृत्व दिलं गेलं आहे. कोहलीच्या जागी हनुमा विहारी याचा संघात समावेश केला आहे. याव्यतिरिक्त पहिल्या सामन्यातला विजयी संघच भारतानं, या सामन्यातही कायम ठेवला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं १-० अशी आघाडी घेतली आहे.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image