राज्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांमधे ओबीसींच्या नोकरभर्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली. अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या ८ जिल्ह्यांमध्ये गट-क आणि गट-ड संवर्गातल्या सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचं सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय १५ सप्टेंबर २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. त्यानुसार ३ जानेवारीला सुधारित बिंदुनामावलीचा आदेश सामान्य प्रशासन विभागानं जारी केला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.