नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवली इथल्या सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयानं मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.