प्रजासत्ताक दिनी लष्कराचं संचलन सकाळी १०:३० वाजता सुरु होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथ इथं होणारं लष्कराचं संचलन सकाळी १० ऐवजी साडे दहा वाजता सुरु होईल. रायसीना हिलपासून संचलनाला सुरुवात होऊन राजपथ, इंडिया गेटमधून लाल किल्ल्यापर्यंत जाणारी परेड यावर्षी केवळ नॅशनल स्टेडियमपर्यंत होणार आहे.

तर राज्य, विविध मंत्रालयं आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांची झलक दाखवणाऱ्या चित्ररथांचा प्रवास लाल किल्ल्यापर्यंत असेल. कोविड-१९ चे नियम लक्षात घेता प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेणार्या् तुकड्यांची संख्या १४४ वरून ९६ इतकी  कमी करण्यात आली आहे, अशी माहिती मेजर जनरल आलोक कक्कर यांनी दिली.

या वर्षीच्या संचलनात लष्कराचे जवान लष्करात १९५० पासून आजपर्यंत परिधान करण्यात आलेले विविध गणवेश घालून सहभागी होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.