भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आता २३ जानेवारीपासून

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचं औचित्य साधत यावर्षीपासून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सुरुवात २३ जानेवारीपासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दर वर्षी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम २४ जानेवारीपासून सुरू होतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.