दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून केप टाऊन इथं सुरू झाला आहे. भारतानं नाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या २ बाद ३३ धावा झाल्या होत्या. के. एल. राहुल १२ धावांवर आणि मयंक अग्रवाल १५ धावांवर बाद झाला. या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त असू्न आजचा सामना खेळणार आहे, असं विराट कोहलीनं काल वार्ताहर परिषदेत सांगितलं होतं. दुसऱ्या सामन्याला तो पाठदुखीमुळे मुकला होता. जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज मात्र दुखापतीमुळे खेळू शकणार नाही असं कोहली म्हणाला. या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळं मालिका विजयासाठी दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image