गिरीश वालावलकर यांच्या ‘एके दिवशी’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

  गिरीश वालावलकर यांच्या ‘एके दिवशी’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी डॉ. गिरीश वालावलकर यांनी लिहिलेल्या ‘एके दिवशी’ या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन झाले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक अजित भुरे, मेहता प्रकाशनचे अखिल मेहता, लेखक डॉ.गिरीश वालावलकर तसेच डॉ. अलका वालावलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्रात येण्यापूर्वी बंगाली भाषेत विपुल साहित्य असल्याचे आपले मत होते. परंतू महाराष्ट्रात आल्यावर मराठी भाषेत कितीतरी थक्क करणारे आणि सुंदर साहित्य असल्याचे आपल्या लक्षात आल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.  प्रादेशिक भाषांमध्ये उत्तमोत्तम चांगले साहित्य असून हे समाजासमोर आले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. डॉ. गिरीश वालावलकर यांचे शिक्षण विज्ञान विषयातील असून त्यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. गिरीश वालावलकर हे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सीईओ म्हणून काम करीत असतानाच त्यांनी वैविध्यपूर्ण लिखाण केले आहे. ‘एके दिवशी’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी प्रचलित परिस्थितीतल्या जगाचे अभ्यासपूर्ण व साहित्यमूल्य असलेले लिखाण केले असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. डॉ वालावलकर यांच्या पुस्तकावरून मालिका व चित्रपट होण्याच्या असंख्य संभावना असल्याचे अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

युवा उद्योजकांना नवा उद्योग सुरु करताना सुरुवातीला अनेक आर्थिक अडचणी येतात. अशावेळी उद्योजक आर्थिक गुन्हेगारांच्या कचाट्यात सापडू शकतात. या दृष्टीने कथानकाच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे लेखक डॉ.गिरीश वालावलकर यांनी सांगितले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image