राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

  मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

मुंबई : ६१ व्या  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.

या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी रु.५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) याप्रमाणे एकूण १५ पारितोषिके देण्यात येणार आहेत. इच्छुक कलावंतांनी अर्ज करण्यासाठी दि. ०५ ते १५ जानेवारी, २०२२ या कालावधीत कला संचालनालयाच्या http://doaonline.in/doakalapradarshan/public/home या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर कराव्यात, असे आवाहन  कला संचालनालयाचे,  प्र. कला संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.