देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटींहून अधिक मुलांना मिळाली लस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात १५ ते १८ वयोगटातल्या ३ कोटी हुन अधिक मुलांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्र मिळाली आहे. युवा भारतात जबाबदारीची मोठी जाणीव आणि उत्साह दिसून येत आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडाविया यांनी म्हटलं आहे. सर्व युवा मित्रांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.