महिला आणि युवकांच्या सामाजिक तसंच शैक्षणिक सक्षमीकरणाद्वारे प्रत्येक राज्य वेगानं विकास करु शकेल- एम व्यंकय्या नायडू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि युवकांच्या सामाजिक तसंच शैक्षणिक सक्षमीकरणाद्वारे प्रत्येक राज्य विकासाच्या इंजिनात परिवर्तित होऊ शकेल, असं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज केरळात व्यक्त केलं. ते संत कुरियाकोस ऊर्फ चवारा यांच्या दीडशेव्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. संत चवारा यांनी १९ व्या शतकात केरळी समाजाचा सर्वांगीण विकास केला, त्यांनी समाजातल्या सर्व घटकांसाठी शाळा सुरू केल्या तसंच या शाळांमधे माध्यान्ह भोजनाची कल्पना राबवल्याचं  उपराष्ट्रपतींनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यावेळी उपस्थित होते.

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image