राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजन केले

 

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच कुशावर्त येथे देखील पुजा करून दर्शन घेतले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसर उपस्थित होते. यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image