मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरू गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुरू गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : शीखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या प्रकाश पूरब निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात ‘कुणालाही घाबरवू नका आणि कुणाला घाबरू नका, दुर्बलांचे रक्षण करा’ अशी शिकवण श्री गुरु गोविंदसिंह यांनी शिकवण दिली.त्यांच्याकडून मानवता तसेच शौर्य आणि धैर्याची प्रेरणा घेऊया. गुरु गोविंदसिंह यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम. शीख बांधवांना या प्रकाश पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.