नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाईल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत इंडिया गेट इथं नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी देशाच्या कृतज्ञतेचं प्रतिक असेल, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे. ग्रेनाइट उभारला जाणारा हा पुतळा पुर्ण होईपर्यंत त्याठिकाणी नेताजीचा पुतळा त्रीमिती छायाप्रकाशाच्या साहाय्यानं साकार केला जाईल. या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण येत्या २३ तारखेला नेताजीच्या जन्मदिनी आपण करणार असल्याचं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.