देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ४ हजार ८६८ रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ४ हजार ८६८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक १ हजार २८१ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. त्याखालोखाल राजस्थानमध्ये ६४५ , दिल्ली ८४६, कर्नाटक ४७९ तर केरळमध्ये ३५० रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत १ हजार ८०५ रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.