कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 ची लाट पुन्हा उसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश ही 5 राज्यं तसंच दादरा- नगरहवेली आणि दमण – दीव हे केंद्रशासित प्रदेश बैठकीत सहभागी होतील.