केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातल्या 19 कोटी 84 लाख मात्रा अद्याप लाभार्थ्यांना द्यायच्या बाकी आहेत. 15 वर्षांवरच्या मुलांसाठीचं लसीकरण आजपासून सुरु झालं आहे.