आजपासून लग्नसमारंभात ५० तर अंत्यसंस्काराला केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं पुन्हा काही निर्बंध जारी केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यानुसार लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थितांची मर्यादा ५० केली आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा दिली आहे. राज्यातली पर्यटन स्थळं, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगण इत्यादी ठिकाणी सक्षम प्राधिकरण आवश्यकतेनुसार जमावबंदी लागू करु शकेल. राज्य शासनानं जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे.