देशात आतापर्यंत १३१ कोटी १८ लाखापेक्षा जास्त लस मात्रांचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ७ हजार ६७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ४१ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ८ हजार ५०३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या देशात जवळपास ९४ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. काल ७४ लाख ५७ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशींच्या मात्रा देण्यात आल्या. आतापर्यंत देशात १३१ कोटी १८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्या आहेत.