राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्यांचा गौरव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं, दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्यं आणि जिल्ह्यांना राष्ट्रपतींनी हे पुरस्कार प्रदान केले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यावेळी उपस्थित होते. श्रवण दोष असणारा औरंगाबादचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता जलतरणपटू सागर बडवे आणि लातूरच्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती पोहेकर यांना यावेळी पुरस्कार देण्यात आला.