वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीवर जीएसटी लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या कमिशनवर पाच टक्के जीएसटी आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. या प्रकरणी सांगली इथल्या एका नोंदणीकृत कमिशन एजंटनं याचिका दाखल केली होती. प्राधिकरणाच्या निर्णयामुळे बाजारात खरेदी-विक्री व्यवहारात सेवा देणाऱ्या अडतदारांना यापुढे जीएसटी कायद्या अंतर्गत नोंदणी करणं बंधनकारक असेल. तर हा निर्णय हळदीच्या व्यवहारावर मोठा परिणाम करणारा असल्याचं मत व्यापारी वर्गानं व्यक्त केलं आहे. राज्यात दर वर्षी एकूण ५५ लाख हळद पोत्याची उलाढाल होते. त्यापैकी मराठवाड्यातल्या हळदीचा वाटा मोठा आहे. जीएसटीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यसरकारला मोठा महसूल मिळणार आहे.

 

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास
Image
सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू
Image