लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा - राजेश टोपे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू संसर्गामुळं 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं. ते आज जालन्यात बोलत होते. राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सांगलीत दक्षिण आफ्रिकेतुन आलेला एक रुग्ण दगावला आहे. या रुग्णाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र त्याच्या चाचणीचा जिनोमिक सिक्वेसिंग अहवाल आल्यानंतरच बोलता येईल अशी माहिती टोपे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील मुंडेवाडी येथे आश्रमशाळेत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. याठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग पूर्ण करून घेतलं जाईल. शिवाय अत्यावश्यक गोष्टी केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.