सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या सात वर्षात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. आपत्ती आणि प्रतिसाद या विषयावर गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. ही यंत्रणा पोलिस चौकी स्तरापर्यंत पोहोचवली असल्याचं शाह म्हणाले. सायबर गुन्हे- धोके, आव्हान देशातील 16347 पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांचा मागोवा घेणारी यंत्रणा लागू करण्यात आली आहे. तसंच नवनिर्मित पोलिस ठाण्यांपैकी 99 टक्के ठाण्यांमध्ये शंभऱ टक्के प्राथमिक तपास अहवाल थेट या नव्या प्रणालीत नोंदवली जाते. त्याशिवाय सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिस आणि वकिल यांना प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही शहा यांनी सांगितलं.