बृह्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून प्रत्यक्ष सुरु होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृह्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा उद्यापासून प्रत्यक्ष सुरु होणार आहेत. मुंबईत याआधीच इयत्ता आठवी ते १२ वी च्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु केल्या आहेत. पहिली ते सातवीच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याबाबत पालिकेनं ३० नोव्हेंबरला परिपत्रक जारी केलं होतं. त्यानंतर गेल्या बुधवारी अतिरिक्त सूचनांचं पत्रकंही जारी केलं. त्यानुसार उद्यापासून मुंबईतल्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या इयत्ता पहिले ते सातवीचे वर्ग प्रत्यक्ष सुरु होत असल्याचं मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागानं आज प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.