राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत १२ विरोधी पक्ष सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्यांवरून आजही गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. शून्य प्रहरातलं कामकाज चालवण्याचा प्रयत्न अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू करत असताना विरोधी सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत निलंबन मागं घेण्याची मागणी केली. शून्य प्रहरातलं कामकाज महत्वाचं असल्यानं ते चालू द्यावं, असं आवाहन नायडू यांनी या सदस्यांना केलं. मात्र, गोंधळ चालूच राहिल्यानं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत, तर नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.