रात्रीच्या वेळीही लसीकरण करायची मुंबई महानगरपालिकेची योजना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरोधी लसीकरणाचा वेग वाढवा यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही भागात रात्रीच्या वेळीही लसीकरण करायची योजना मुंबई महानगरपालिकेनं आखली आहे. लसीकरणासाठी ज्या नागरिकांना काम सोडून जाता येणं शक्य नाही त्यांच्यासाठी प्रामुख्यानं ही योजना आहे. सध्या लसीकरण केंद्रं सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू असतात. ही केंद्र ५ ला बंद करण्याऐवजी रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी व्हायला आणखी काही दिवस जातील अशी माहिती महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. पोलिओ लसीकरण मोहिमेत ज्या पद्धतीनं काम केलं गेलं त्याप्रमाणे ही योजना कार्यान्वित होईल असंही त्या म्हणाल्या.