बियाणं आणि कीटकनाशकांची भेसळ रोखण्यासाठी तसंच किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार यंत्रणा विकसित करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना वेळेत आणि वाजवी किमतीत बियाणं आणि किटकनाशके मिळावीत. उत्पादक कंपन्यांनी तयार केलेली उत्पादने उत्तम दर्जाची असावीत, यासाठी त्याचं ट्रॅकिंग होणारी यंत्रणा लवकरच कार्यांवित केली जात असून, त्यासाठी ई-मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्यात येत असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.  या संदर्भात काल सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत ते  बोलत होते. बी-बियाणं आणि किटकनाशकांची विक्री होताना त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ होऊ नये, यासाठी उत्पादक कंपन्या आणि त्यांच्यामार्फत तयार होणारी उत्पादनं दर्जेदार असावीत. त्याची देखरेखही या यंत्रणेमार्फत केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी सहसचिव गणेश पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.