कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३५ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १३५ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला. काल ६८ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांनं दिलेल्या लस मात्रांची एकूण संख्या १३४ कोटी ६१ लाखांच्यावर गेली. आज सकाळपासून ४१ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात काल १० हजार २३० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ७ लाख ४ हजार ४०४ नागरिकांना लस दिली. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १२ कोटी ५२ लाख ४३ हजार ९१ झाली असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. यात ४ कोटी ७१ लाख २२ हजार २७७ लाभार्थ्यांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.