जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा किदंबी श्रीकांत ठरला पहिला भारतीय बॅडमिंटनपटू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बँटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा सामना सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याशी होणार आहे. श्रीकांत हा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणारा पहिलाच भारतीय पुरुष बँटमिंटनपटू आहे. स्पेनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य फेरीत, श्रीकांतने भारताच्याच लक्ष्य सेनचा १७-२१, २१-१४, २१-१७ असा पराभव केला. या स्पर्धेत प्रथमच खेळण्यास उतरलेला लक्ष्य सेन कांस्य पदकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत भारताला प्रथमच एकाच हंगामात दोन पदकं मिळणार आहेत. या स्पर्धेत यापूर्वी १९८३ मध्ये प्रकाश पदुकोण यांनी तर २०१९ मध्ये बी साईप्रणीत ने पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकलं आहे.