महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४३ रुग्ण आंतराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ४ त्यांच्या सहवासातले आहे. गंभीर बाब म्हणजे या ८५ रुग्णांपैकी ३८ रुग्णांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. पुण्यातल्या आयसर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेनं केलेल्या समुदाय सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले. या रुग्णांमधले १९ मुंबईतले, ५ कल्याण-डोंबिवलीतले, नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमधले प्रत्येकी ३ रुग्ण आहेत. तर प्रत्येकी २ रुग्ण वसई-विरार आणि पुणे शहरातले तर एक रुग्ण ठाणे शहर, पनवेल, भिवंडी आणि पुण्याच्या ग्रामीण भागातला आहे. राज्यात काल कोरोनाच्या ३ हजार ९०० नव्या रुग्णांची नोंद झाली तर १ हजार ३०६ रुग्ण बरे झाले. २० कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळं राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. सध्या राज्यात सुमारे सव्वा लाख रुग्ण गृह विलगीकरणात आहेत तर ९०५ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत आणि १४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image