देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ९ हजार ५२५ जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले, तर ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ३६ शतांश टक्के झालं आहे. देशात सध्या ९३ हजार ७३३ ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.